पाटण बीट (एक पाऊल गुणवत्तेसाठी)
हा ब्लॉग पाटण बीटातील शाळांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे प्रदर्शन करतो.बीटामध्ये अडूळ ,मेंढोशी व पाटण या 3 केंद्रांतर्गत 32 शाळा आहेत.
Pages
- Home
- माझी शाळा माझा फळा लिंक
- गणित संबोध
- शिक्षक प्रशिक्षण
- शाळा सिद्धी
- PPF विषयी माहिती
- म्हावशी शाळेचे videos
- प्रगत महाराष्ट्र
- ज्ञानरचनावादी उपक्रम
- संगीत शिक्षण
- प्रकल्प
- ऐतिहासिक पुस्तके
- रांगोळी कला
- लाभाच्या योजना
- शैक्षणिक माहितीचा खजिना
- कविता
- pdf पाठ्यपुस्तके
- किशोर मासिके
- MDM app download
- income tax return साठी
- वीजबिल भरा online
- यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ
- मतदार यादीतील नाव शोधा
- १० वी, १२ वी marksheet
- LIC online payment
- student पोर्टल
- शासन निर्णय - श्री. प्रदीप कुंभार
- कमी data तेजस video - इयत्ता पहिली
- कमी data तेजस video- इयत्ता २ री
- कमी data तेजस video- इयत्ता ३ री
- कमी data तेजस video- इयत्ता ४ थी
- तेजस data install लिंक
Monday, 6 January 2020
🙏🏻🙏🏻 *बालिका दिन*🙏🏻🙏🏻 *🥬जि.प.प्राथ.शाळा,डिगेवाडी🥦* आज बालिका दिनानिमित्त शाळेत बालबाजाराचे आयोजन करण्यात आले होते. *🍒🍉बालबाजारातील प्रमुख बाबी:-🍋🥔* 👉🏻१) शाळेत प्रथमच अशा प्रकारच्या बाजाराचे आयोजन 👉🏻२) विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त सहभाग 👉🏻३) बाजार घेण्यासाठी ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गर्दी 👉🏻४) अडुळपेठ व काळेवाडी शाळेतील मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांची बाजाराला भेट व खरेदी 👉🏻५) अंगणवाडी डिगेवाडी व काळेवाडी यांची बाजारास भेट 👉🏻६) सरपंच, ग्रामसेवक व पोलिस पाटील तसेच विविध मंडळांचे पदाधिकारी यांची भेट 👉🏻७) मा.केंद्रप्रमुख श्री. चव्हाणसाहेब यांची भेट *बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आलेले* *🍔🥘पदार्थ🍿🍫* 👉🏻वडापाव, ढोकळा, इडली, पॅटिस, मंच्युरिअन, बिस्किटे, चॉकलेट *🌶🍅भाजीपाला🍈🥙* 👉🏻कांदे,बटाटे,वांगी,मिरची, घेवडा, पावटा,कारले, वाटाणा, मेथी,माठ,कोथिंबीर *विद्यार्थ्यांना बाजारातून खूप आनंद मिळाला. व्यवहार ज्ञान मिळाले, बाजारपेठ कशी असते याचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.* *यावेळी शिक्षक, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व स्तरातून विद्यार्थ्यांचे 👍🏻👍🏻कौतुक 👌🏻👌🏻 करण्यात आले....* 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Tuesday, 24 December 2019
Thursday, 5 December 2019
🍐🍐🍐🍐🍐🍐🍐🍐🍐🍐 *जि.प.शाळा,अडूळपेठ* 🍐 *अशी रंगली पेरूंची पार्टी*🍐 *इयत्ता:-* चौथी *विषय:-* गणित *घटक:-* अपूर्णांक हा घटक शिकवताना शैक्षणिक साहित्य म्हणून पेरू वापरण्यात आले. मुलांना संकल्पना स्पष्ट करण्यासाठी पेरू हे साहित्य अत्यंत प्रभावी वाटले. यामध्ये १) पाव- सव्वा २) अर्धा- साडे ३) पावणे या संकल्पना पटकन समजल्या... आणि राहिलेल्या पेरूंचा सर्वांनी मनसोक्त आनंद घेतला.😋 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 काही क्षणचित्रे 👇🏻
Monday, 7 October 2019
🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮 *चला करु साजरी, आनंदाची दिपावली* 🌹 *कृतीतून अनुभवाकडे* 🌹 जि.प.प्राथ.शाळा, अडूळपेठ येथे मुलांनी दिपावलीची तयारी स्वतः कृतीतून केली. १) *आकाशकंदील:-* 👉🏻 *टाकाऊ पासून टिकाऊ* Use & throw म्हणून वापरात असणारे चहाचे कागदी कप वापरून तयार केले आकाशकंदील.. २) *पणती:-* 👉🏻 बाजारातून मातीच्या तयार पणत्या आणून त्यांना आपल्या आवडत्या रंगात रंगवून तयार झाल्या दिपावलीसाठी पणत्या.. 🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇
Thursday, 29 August 2019
Wednesday, 14 August 2019
*अस्थायी आंतरराष्ट्रीय शाळा प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम* *अवघा जन्म सफळ झाला,आजी म्या देव देखीयेला* या उक्तीची प्रचिती नुकतीच आली.प्रसंग होता आंतरराष्ट्रीय शाळेच्या प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम,मलबार हिल मुंबई येथील.दि-,९/८/२०१९ रोजी मलबार हिल,मुंबई येथे *आंतराष्ट्रीय शाळेच्या प्रमाणपत्र वितरणाचा* कार्यक्रम *महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने* आयोजित केला होता.या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे *राज्यपाल महामहिम के.विद्यासागर राव* अध्यक्ष स्थानी होते.यावेळी राज्याचे उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री *मा.श्री.विनोद तावडे* शालेय,क्रीडा व युवक कल्याण मंत्री *मा.श्री.आशिष शेलार* भारतातील प्रथम संगणक बनविणारे थोर संशोधक *मा.श्री.विजय भटकर* MIEB संचालक *मा.श्री.सुनील मगर* MIEB पाठयपुस्तक निर्मिती प्रमुख *सौ.प्राची साठे मॅडम* इ.मान्यवर उपस्थित होते. यावेळी *राज्यपाल महामहिम मा.के.विद्यासागर राव* व सर्व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते *भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जि. प.शाळा,म्हावशी* शाळेचे मुख्याध्यापक *श्री.रवींद्र रामचंद्र ताटे* यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार झाला.
Saturday, 27 July 2019
Wednesday, 17 July 2019
Monday, 24 June 2019
Tuesday, 29 January 2019
Thursday, 17 January 2019
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *जि.प.प्राथ.शाळा, अडुळपेठ* 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 आज शाळेत *मकर संक्रांत* सणानिमित्त *हळदी-कुंकू* कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गावातील सर्व महिला भगिनी अगदी उत्साहाने सहभागी झाल्या. या वर्षीच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते ते म्हणजे मुलांचा *सांस्कृतिक कार्यक्रम* कार्यक्रमाची सुरुवात *सरस्वती पूजनाने* झाली... मराठी हिंदी अशा विविध गाण्यांवर मुलांनी *रेकॉर्ड डान्स* सादर केले... मुलांबरोबरच सर्व पालक वर्ग आजच्या कार्यक्रमाचा आनंद घेताना दिसून आला... आजच्या कार्यक्रमाच्या आयोजनाचे सर्वांनी कौतुक केले.. *आजच्या कार्यक्रमाला गावातील सर्व महिला भगिनी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामस्थ व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते...* 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 *कार्यक्रमातील काही क्षणचित्रे..* 👇🏻👇🏻👇🏻👇🏻
Friday, 4 January 2019
🎨🎨🎭🎨🎨🎭🎨🎨🎭🎨🎨 *जि.प.प्राथ.शाळा, अडुळपेठ* *माझी शाळा,माझे उपक्रम* 🎨 *AIL related activity* *stone art* *आवश्यक साहित्य - वेगवेगळ्या आकाराचे दगड, रंग, ब्रश, इ.* परिसरातील दगड जमा करून त्यावर *जि.प. शाळा अडुळपेठ* येथील मुलांनी केलेल्या ३० हुन अधिक शैक्षणिक कलाकृती तयार केल्या. या activity मुळे मुलांमधे विविध विषयाची गोडी, शिक्षणातील आनंद, कलाकृतीची आवड निर्माण होण्यास मदत मिळली. शिक्षण प्रक्रियेत रंजकता आणण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त आहे. *Stone art चे काही नमुने* 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
Monday, 31 December 2018
*जि.प.प्राथ.शाळा, अडुळपेठ* आजचा उपक्रम:- *आठवडी बाजार* 🥗🥗🥗🥗🥗🥗🥗🥗🥗🥗🥗 *आज शाळेत आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात आले. बाजारासाठी मुलांनी सर्व प्रकारचा भाजीपाला तसेच खाऊ चे पदार्थ यांची दुकाने लावली.* *बाजारामध्ये मुले आपला माल विकताना व्यवहारातील भाषा वापर होते.* विक्रेता व ग्राहक यांच्यामधे संवाद होत होते.. *पालक आपल्या पाल्यांकडून शेती माल विकत घेताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद अनुभवण्यास मिळाला..* *मुले व्यवहारातील सुटे व बंदे पैसे यांचा उत्तम वापर करताना दिसून आली..* आजच्या बाजारामध्ये पालकांचा सहभाग विशेष जाणवणारा वाटला. *आठवडी बाजाराच्या उपक्रमाला ग्रामस्थांनी भरभरून कौतुक केले.* *शाळेमध्ये राबविले जाणाऱ्या अनेक उपक्रमांबद्दल पालकांकडून कौतुक करण्यात आले..* 🙏🏻
Subscribe to:
Posts (Atom)