Monday 31 December 2018

*जि.प.प्राथ.शाळा, अडुळपेठ* आजचा उपक्रम:- *आठवडी बाजार* 🥗🥗🥗🥗🥗🥗🥗🥗🥗🥗🥗 *आज शाळेत आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात आले. बाजारासाठी मुलांनी सर्व प्रकारचा भाजीपाला तसेच खाऊ चे पदार्थ यांची दुकाने लावली.* *बाजारामध्ये मुले आपला माल विकताना व्यवहारातील भाषा वापर होते.* विक्रेता व ग्राहक यांच्यामधे संवाद होत होते.. *पालक आपल्या पाल्यांकडून शेती माल विकत घेताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद अनुभवण्यास मिळाला..* *मुले व्यवहारातील सुटे व बंदे पैसे यांचा उत्तम वापर करताना दिसून आली..* आजच्या बाजारामध्ये पालकांचा सहभाग विशेष जाणवणारा वाटला. *आठवडी बाजाराच्या उपक्रमाला ग्रामस्थांनी भरभरून कौतुक केले.* *शाळेमध्ये राबविले जाणाऱ्या अनेक उपक्रमांबद्दल पालकांकडून कौतुक करण्यात आले..* 🙏🏻




Sunday 16 December 2018

*आज जि.प.प्राथ.शाळा,अडुळपेठ.. येथे सौ.अर्चना रामचंद्र पवार यांच्याकडून मुलांना गोड शिरा, सांबर भात असे सस्नेह भोजन देण्यात आले...*


वनभोजन जि प शाळा येरफळे


गोवर व रुबेला लसीकरण



🍿🍿🍿🍿🍿🍿🍿🍿🍿🍿🍿 *जि.प.प्राथ.शाळा, अडुळपेठ.* *माझी शाळा,माझे उपक्रम* इ.३री विषय:- परिसर अभ्यास घटक:- स्वयंपाक घरात जाऊया आज या पाठावर आधारित असणारा *आपला खाऊ आपणच बनवू* हा उपक्रम घेण्यात आला. सर्व मुलांनी या *भेळ पार्टीचा* आनंद लुटला. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻