Monday 31 December 2018

*जि.प.प्राथ.शाळा, अडुळपेठ* आजचा उपक्रम:- *आठवडी बाजार* 🥗🥗🥗🥗🥗🥗🥗🥗🥗🥗🥗 *आज शाळेत आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात आले. बाजारासाठी मुलांनी सर्व प्रकारचा भाजीपाला तसेच खाऊ चे पदार्थ यांची दुकाने लावली.* *बाजारामध्ये मुले आपला माल विकताना व्यवहारातील भाषा वापर होते.* विक्रेता व ग्राहक यांच्यामधे संवाद होत होते.. *पालक आपल्या पाल्यांकडून शेती माल विकत घेताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद अनुभवण्यास मिळाला..* *मुले व्यवहारातील सुटे व बंदे पैसे यांचा उत्तम वापर करताना दिसून आली..* आजच्या बाजारामध्ये पालकांचा सहभाग विशेष जाणवणारा वाटला. *आठवडी बाजाराच्या उपक्रमाला ग्रामस्थांनी भरभरून कौतुक केले.* *शाळेमध्ये राबविले जाणाऱ्या अनेक उपक्रमांबद्दल पालकांकडून कौतुक करण्यात आले..* 🙏🏻




Sunday 16 December 2018

*आज जि.प.प्राथ.शाळा,अडुळपेठ.. येथे सौ.अर्चना रामचंद्र पवार यांच्याकडून मुलांना गोड शिरा, सांबर भात असे सस्नेह भोजन देण्यात आले...*


वनभोजन जि प शाळा येरफळे


गोवर व रुबेला लसीकरण



🍿🍿🍿🍿🍿🍿🍿🍿🍿🍿🍿 *जि.प.प्राथ.शाळा, अडुळपेठ.* *माझी शाळा,माझे उपक्रम* इ.३री विषय:- परिसर अभ्यास घटक:- स्वयंपाक घरात जाऊया आज या पाठावर आधारित असणारा *आपला खाऊ आपणच बनवू* हा उपक्रम घेण्यात आला. सर्व मुलांनी या *भेळ पार्टीचा* आनंद लुटला. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻


Thursday 1 November 2018

आकाश कंदील निर्मिती.. जि.प.शाळा येरफळे



जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व रची मेंढोशी येथे गोवर रुबेला लसीकरण जनजागृती करण्यात आली त्या निमित्ताने रांगोळी स्पर्धा व मेहंदी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्याची क्षणचित्रे






जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व रची मेंढोशी भेट कार्ड तयार करण्याची कार्य शाळा घेण्यात आली त्या मध्ये तयार केले ली भेटकार्ड सह विद्यार्थी



मम्मी म्हणा मदर म्हणा *आई* शब्दात *जीव* आहे .... पिता म्हणा पप्पा म्हणा, *बाबा* शब्दात *जाणीव* आहे सिस्टर म्हणा दीदी म्हणा *ताई* शब्दात *मान* आहे .... ब्रो म्हणा भाई म्हणा *दादा* शब्दात *वचक* आहे.... फ्रेंड म्हणा दोस्त म्हणा *मित्रा* शब्दात *शान* आहे .... एन्ड म्हणा फिनिश म्हणा *अंत* शब्दात *खंत* आहे ..... दिवार म्हणा वॉल म्हणा *भिंत* शब्द *जिवंत* आहे रिलेशन म्हणा रिश्ता म्हणा *नातं* शब्दात *गोडवा* आहे एनिमी म्हणा दुश्मन म्हणा *वैर* शब्द जास्त *कडवा* आहे.. हाय म्हणा हॅलो म्हणा, *हात* जोडणे *संस्कार* आहे सर म्हणा मॅडम म्हणा *गुरु* शब्दात *अर्थ* आहे ग्रँड पा ग्रँड मा शब्दात काही मजा नाही *आजोबा आणि आजी* सारखे सुंदर *नाते* जगात नाही.. गोष्टी सर्व सारख्या पण *फरक* फार *अनमोल* आहे *अ ते ज्ञ शब्दात ज्ञानाचे भांडार आहे*... *म्हणुन इंग्रजी पेक्षा आपल्या मराठीत आदर जास्त आहे* 👍👍👍👍👍⛳⛳⛳⛳⛳


Wednesday 10 October 2018

*आज जि. प.शाळा,म्हावशी येथे गुणवत्ता वाढ शाळा भेट याअंतर्गत मा.श्री.आर.आर.कांबळे साहेब उपमुख्य कार्यकारी अधिकारी सातारा तथा अतिरिक्त गट विकास अधिकारी,पाटण यांनी भेट दिली.सकाळच्या सत्रात त्यांनी परिपाठाची पाहणी करून गौरवोद्गार काढले.त्यानंतर शाळेच्या वतीने त्याचे पुस्तक व देऊन स्वागत करण्यात आले.त्यावेळी स्वतः आदरणीय साहेबानी मुलांना आपली ओळख करून दिली व मुलांना मार्गदर्शन केले.* *यानंतर साहेबांनी प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहणी केली.विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला.यानंतर शाळेच्या सर्व अभिलेकांची पाहणी केली.एकंदरीत शाळेच्या कामकाजाविषयी आदरणीय साहेबानी कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या* *शेवटी शाळेच्या वतीने त्यांना एक रोप भेट देवून साहेबांचे आभार मानण्यात आले*



🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 *जि.प.प्राथ.शाळा,अडुळपेठ* आज कार्यानुभव विषयांतर्गत(दिवाळी विशेष) *शाडूच्या मातीपासून पणती तयार करणे.* हा उपक्रम घेण्यात आला. 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻



Tuesday 2 October 2018

इयत्ता पहिली online प्रशिक्षण जि.प.शाळा डिगेवाडी येथे संपन्न


जि.प.शाळा लुगडेवाडी येथे गणेश उत्सवानिमित्त डान्स स्पर्धा घेण्यात आल्या.


जि.प.शाळा डिगेवाडी येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा..


स्वच्छ व सुंदर शाळा, जि.प.शाळा डिगेवाडी


परिसर स्वच्छता, जि.प.शाळा लुगडेवाडी



परिसर भेट, रुद्रेश्वर देवस्थान, येराडवाडी.. जि.प.शाळा अडुळपेठ




रक्षाबंधन, जि.प.शाळा डिगेवाडी


रक्षाबंधन जि.प.शाळा अडुळपेठ


डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती, शिक्षक दिन, जि.प.शाळा म्हावशी


मातीपासून गणपती बनवणे , जि.प.शाळा अडुळपेठ