Friday 26 August 2016

💐💐गोपाळकाला (मटकी फाेडणे) उपक्रम💐💐 जि. प.शाळा लुगडेवाडी ता.पाटण जि.सातारा आज शनिवार दि.२७/८/२०१६रोजी मटकी फोडणे उपक्रम राबवण्यात आला.या उपक्रमास व्य स अध्यक्ष सौ .लुगडे ,ग्रामस्थ,तरूणमंडळी उपस्थित होते. आमच्या शाळेत हा उपक्रम वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.सर्व मुले वेगवेगळी वेषभूषा परिधान करून आलेली होती. त्याच्यामध्ये एक वेगळाच उत्साह दिसत होता.कु.सोहम कदम इ.१ ली.श्रीकृष्ण बनून आलेला होता तर कोण राधा तर कोण मीरा बनून आलेले होते. नंतर प्रत्येक विद्यार्थ्याचे डोळे बांधून मटकी फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला.मुले या अनोख्या उपक्रमाने भारावून गेली होती.व उपक्रमाचा मनमुराद आनंद घेत होत होती. या उपक्रमामुळे मुले अचुकता, नेम धरणे,दिशा ठरवणे,आवाजाच्या दिशेने अंदाज घेणे इ.कृती सहजगत्या करत होती .व आत्मसात करत होती. शेवटी कु.पोर्णिमा मुगदूम इ.४थी या विद्यार्थीनीने अचूकता साधत मटकी फोडली.व सर्वानी नाचत उड्या मारत आनंदोत्सव साजरा केला. व्य स अध्यक्ष ,व सर्व उपस्थितांनी उपक्रमाचे कौतुक केले.व शाबासकी दिली.💐💐💐💐💐 🌷🌷संयोजक🌷🌷 💐सौ.पाटील .पी.आर. श्री.चौरे.व्ही💐 💐जि.प.शाळा.लुगडेवाडी ता.पाटण.जि.सातारा💐


Thursday 25 August 2016

अडूळपेठ शाळेत श्रीकृष्ण जन्माष्टमी


Teacher training


💐💐गोपाळकाला चिमुकल्यांचा मेळा 💐💐 आज म्हावशी शाळेमध्ये गोपाळकाला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेमध्ये काही मुले श्रीकृष्ण रूपात आली होती. संपूर्ण शाळा कृष्णमय झाली होती. गोपाळकाल्याच्या निमित्ताने गावातील भक्त जनांनी मुलांना स्नेहभोजन दिले. आज शाळेमध्ये महिलांच्या झिम्मा फुगडीच्या स्पर्धा घेण्यात आल्या.महिलांनी मंगळागौरीची गीते म्हणून फेर धरला. मुलांचा " डोळे बांधून काठीने दही हंडी फोडणे" हा खेळ घेण्यात आला. शेवटी सर्वांच्या साक्षीने गोविंदांनी दोन थर रचून दही हंडी फोडली. शाळेचा परिसर " हाथी,घोड़ा पालखी ,जय कन्हैया लाल की " गर्जनांनी दुमदुमून गेला. 🙏🏻🙏🏻🙏🏻धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, म्हावशी ता.पाटण जि.सातारा