Wednesday, 14 August 2019

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिगेवाडीत अवतरली सूर्यमाला



*अस्थायी आंतरराष्ट्रीय शाळा प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम* *अवघा जन्म सफळ झाला,आजी म्या देव देखीयेला* या उक्तीची प्रचिती नुकतीच आली.प्रसंग होता आंतरराष्ट्रीय शाळेच्या प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम,मलबार हिल मुंबई येथील.दि-,९/८/२०१९ रोजी मलबार हिल,मुंबई येथे *आंतराष्ट्रीय शाळेच्या प्रमाणपत्र वितरणाचा* कार्यक्रम *महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने* आयोजित केला होता.या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे *राज्यपाल महामहिम के.विद्यासागर राव* अध्यक्ष स्थानी होते.यावेळी राज्याचे उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री *मा.श्री.विनोद तावडे* शालेय,क्रीडा व युवक कल्याण मंत्री *मा.श्री.आशिष शेलार* भारतातील प्रथम संगणक बनविणारे थोर संशोधक *मा.श्री.विजय भटकर* MIEB संचालक *मा.श्री.सुनील मगर* MIEB पाठयपुस्तक निर्मिती प्रमुख *सौ.प्राची साठे मॅडम* इ.मान्यवर उपस्थित होते. यावेळी *राज्यपाल महामहिम मा.के.विद्यासागर राव* व सर्व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते *भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जि. प.शाळा,म्हावशी* शाळेचे मुख्याध्यापक *श्री.रवींद्र रामचंद्र ताटे* यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार झाला.


🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 *स्वातंत्र्यदिवस व रक्षाबंधन* हे सण यावर्षी एकाच दिवशी आल्याने हेच औचित्य साधून *जि.प.प्राथ.शाळा, अडूळपेठ* येथील शिक्षक व विद्यार्थिनींनी आपल्या बंधूंसाठी तयार केल्या *तिरंगी राख्या.* 🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻